पाचोरा : प्रतिनिधी
स्थळ नाकारल्यामुळे संशयिताने आपल्या दोन साथीदारांसोबत मुलीच्या वडिलांचे घर गाठून त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावले. शनिवारी रात्री ११.३० वाजता शहरातील गिरडरोडवर ही घटना घडली. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या युवकाच्या पोटावर संशयितांनी चाकूने वार केला. तसेच घटनेनंतर तिघे संशयित आपली दुचाकी सोडून पसार झाले.
गिरळ रोड परिसरातील रहिवासी मुलीस संशयित रोहित राज सोनवणे (रा. मलकापूर) याने आठ महिन्यांपूर्वी मागणी घातली होती. मात्र, मुलीच्या वडिलांनी नकार देत तिचे इतरत्र लग्न लावून दिले होते. या रागातून रोहितने शनिवारी रात्री मुलीचे घर गाठले. तिच्या वडिलांवर पिस्तुल रोखले. ही घटना बघताच कुटुंबियांनी आरडाओरडा केली. शेजारी गोकुळ पाटील हे भांडण येताच रोहितच्या साथीदाराने त्याच्या पोटावर चाकूने वार केला. परीसरातील नागरीक जमा होत असल्याचे निदर्शनास आल्याने रोहित व साथीदारांनी दुचाकी सोडून पळ काढला.