जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर येथे राहणाऱ्या २० वर्षे तरुणांनी राजमार्ती नगरातील एका अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते
कृष्णा सुधीर अहिरे लवय-20) राहणार हर विठ्ठल नगर असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा अहिरे हा मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान आज रविवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राजमालती नगरातील संस्कृती अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून ओळी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, कृष्णा अहिरे यांनी आत्महत्या केली नसून त्याचा घातपात केल्याचा आरोप त्याचे वडील सुधीर अहिरे यांनी केला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता.
मयत कृष्णा अहिरे हा वडील सुधीर अहिरे, आई अनिता अहिरे आणि भाऊ चेतन अहिरे यांच्यासह हरी विठ्ठल नगर असा परिवार आहे.