जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरातील गेंदालाल मिल कॉम्पलेक्समधील एका मेडीकल दुकानातून अजीज खान बाबु खान पठाण याने बळजबरी साडेआठ हजार रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी मेडिकल दुकानदाराने त्या विरोधात तक्रार दाखल केली होती या प्रकरणी शहर पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली आहे.
दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल कॉम्पलेक्स मधील बाळासाहेब लक्ष्मण पाटील यांच्या रामकृष्ण मेडीकल दुकानावर जावुन अजीज खान बाबु खान पठाण याने कंबरेला चॉपर टेबलावर ठेवुन महिना ५ हजार खंडणी द्यावी, लागेल अशी धमकी दिली होती. बाळासाहेब पाटील यांनी नकार दिल्यावर तुला धंदा करू देणार नाही अशी धमकी देवून चापटाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्या मेडीकल दुकानाच्या गल्यातील ८,५०० रुपये रोख जबरीने काढुन नेले होते. या प्रकरणी शहर पो.स्टेला गुरन २८२/२०२२ भादंवि कलम ३९४.३८४,३८५,३२३,५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक कुमार चिथा यांनी शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना आरोपीचा लवकरात लवकर शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी सदर गुन्हयातील आरोपीताचा शोध घेण्याकरीता पोउपनिरी अरुण सोनार, पोउपनिरी दत्तात्रय पोटे पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोना प्रफुल्ल धांडे, पोना राजकुमार चव्हाण, पोना योगेश बोरसे, पोकॉ योगेश इंधाटे, पोका/रतन गिते अशांचे पथक तयार करून संशयिताचा शोध घेण्याकरीता रवाना केले होते. सदर पथकाने गुप्त बातमीदाराकडुन माहिती काढुन अजीज बाबुखान पठाण याला गेंदालाल मिल भागातून समोर सापळा लावून अतिशय शितीफिने अटक केली आहे. सदर आरोपीतांने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, अजीज बाबुखान पठाण याने इतर कोणालाही धमकावले असल्यास किंवा जबरदस्ती करीत असल्यास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.