Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खा.राणा जळगावात करणात हनुमान चालिसा पठण
    जळगाव

    खा.राणा जळगावात करणात हनुमान चालिसा पठण

    editor deskBy editor deskSeptember 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भाजपचे खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी ७ ते ८ यावेळेत दधिची चौकात भव्य सामूहिक हनुमान चालिसा पठण व महाआरती होणार आहे, अशी माहिती महाराणा प्रताप गणेश मंडळाचे अध्यक्ष कल्पेश सोनवणे व ज्येष्ठ सदस्य कैलास सोनवणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

    कैलास सोनवणे यांनी सांगितले की, महाराणा प्रताप मंडळास ३५ वर्षे पूर्ण झाली आहे. मंडळाकडून गणेशोत्सवात धार्मिक देखावा करण्याची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत काशी, सोरटी सोमनाथ, राम मंदिर, श्री कृष्णाचे विराट रूपदर्शन असे देखावे सादर केले आहे. यंदा मंडळाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारुतीचा देखावा करण्यात आला आहे. देखावा हनुमानाचा असल्याने खासदार नवनीत राणा या मंडळात आरतीसाठी येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत मंडळासमोर सामूहिक हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. या ठिकाणी भगव्या साड्या परिधान करून बहुसंख्य महिला देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच मुस्लिमबांधवही उपस्थित राहणार आहेत. सामूहिक हनुमान पठणासाठी आठ ते दहा हजारांवर भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नववीत राणा या जीपमधून मिरवणुकीतून मंडळाच्या जागेवर येतील. त्यांच्या हस्ते आरती होऊन हनुमान चालिसा पठण होईल, अशी माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला सार्वजनिक महामंडळाचे अमित भाटिया, सोमनाथ व्यास, सुरेश सोनवणे, मोरेश्वर मंडोरा, नितीन शर्मा उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.