चोपडा : प्रतिनिधी
तोंडास रुमाल बांधण्यास सांगीतल्याचा राग आल्याने एकाने डॉक्टराला धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, ३ सप्टेंबर रोजी सुभाष पाटील (वय, ५० रा. खाचणे ता.चोपडा) हा आपल्या सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पत्नीचा थुंकीचा रिपोर्ट रुग्णालयात आला होता. यावेळी डॉ. पवन डोंगर पाटील यांनी त्यास तोंडास रुमाल बांधण्यास सांगितले. सुभाष पाटील याला या गोष्टीचा राग आला. त्याने डॉक्टर पाटील यांना शिवीगाळ, दमदाटी तसेच धक्का बुक्की केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.