• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा घेणार सेवा पंधरवाडा

जिल्हाध्यक्ष आ. सुरेश दामू भोळे यांनी दिली माहिती

editor desk by editor desk
September 3, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा घेणार सेवा पंधरवाडा

जळगाव : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणच्या जिल्हा पदाधिकारी यांची बैठक जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि ३ रोजी जळगावातील वसंतस्मूर्ती भाजपा कार्यालय येथे संपन्न झाली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती पर्यंत “सेवा पंधरवाडा” साजरा करण्याचे राष्ट्रीय पातळीवर ठरले असून तो सेवा पंधरवाडा जिल्ह्यात देशील साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर असे विविध समाजपयोगी कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी राबविणे साठी जिल्हा संयोजक म्हणून जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रल्हाद पंडित पाटील व सह संयोजक म्हणून जिल्ह्याचे उपाध्यक्ष डी. एस. चव्हाण सर व जिल्हा चिटणीस प्रशांत पालवे यांची नियुक्ती या बैठकीत करण्यात आली आहे.

तसेच आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव जिल्ह्यात येणार असून त्यांच्या संघटनात्मक दौऱ्यातील कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीचा समारोप करताना जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी सांगितले कि आगामी सेवा सप्ताह यशस्वी करतानाच पुढील काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करून भाजपाचा बालेकिल्ला जळगाव जिल्हा पुन्हा करायचा आहे व भारतीय जनता पार्टीचा ध्वज पुन्हा फडकवायचा आहे. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, राकेश पाटील, हिराभाऊ चौधरी, पद्माकर महाजन, अजय भोळे, प्रल्हाद पाटील, महेश पाटील, कांचन फालक, डी.एस.चव्हाण सर, पी.सी. आबा, जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, मधुकर काटे, हर्षल पाटील, जिल्हा चिटणीस राजेंद्र सोनवणे, प्रशांत पालवे, सोमनाथ पाटील, रवींद्र पाटील, संतोष खोरखळे, शैलेजा पाटील, सविता भालेराव, रंजना नेवे जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी व जिल्हा संवादक हेमंत सोनवणे व गिरीश वराडे हे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई !

Next Post

बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे !
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे !

July 15, 2025
खळबळजनक : माजी मंत्री बच्चू कडूंसह १२ जणांवर गुन्हा दाखल !
क्राईम

खळबळजनक : माजी मंत्री बच्चू कडूंसह १२ जणांवर गुन्हा दाखल !

July 15, 2025
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
राजकारण

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

July 15, 2025
उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका !
राजकारण

उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका !

July 15, 2025
नवविवाहितेने सासरी घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

नवविवाहितेने सासरी घेतला टोकाचा निर्णय !

July 15, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविली रोकड !

July 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group