धरणगाव (प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था (Law and order) राखण्यासाठी आज धरणगाव पोलिस आणि रॅपीड अॅक्शन फोर्सने शहरातून रूट मार्च (Police route march) काढण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावरुन हा रुट मार्च काढण्यात आला.
पोलीस स्थानकापासून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. व्हाईट हाऊस, धरणी, शास्त्री पुतळा आणि त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फॉलिंग करण्यात आली. यावेळी यांच्यासह रॅपीड अॅक्शन फोर्सचे उप कमांडट शशिकांत राय, सह कमांडट संतोष यादव, पो.नि. जी.एस. झारिया, पोलीस निरीक्षक राहुल खेताळ, सपोनि श्री. पाटील, पीएसआय गुंजाळ, पीएसआय पवार, पीएसआय बेलदार यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मार्चमध्ये आरएएफचे ९० जवान, २० पोलीस अंमलदार, २० होमगार्ड अशांनी सहभाग नोंदवला.