जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात गणेश उत्सव आगमन मिरणुकीत गर्दीत ज्वालाग्राही ‘स्प्रे’ हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करुन स्टंटबाजी करणाऱ्या तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील सिंधी कॉलनीत चौकात ज्वालाग्राही ‘स्प्रे’ हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करण्यात येत होते. वास्तविक बघता ‘हिट स्प्रे’ हा ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थ हा घरघुती किटक नाशक म्हणुन वापराकरीता आहे. परंतू, त्याचा गणेश उत्सव आगमन मिरणुकीत गर्दीत व सार्वजनिक ठिकाणी तो ज्वालाग्राही “स्प्रे” हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करुन समीर विनोदकुमार केसवानी (वय २१, रा. गणपती नगर), जयदेव श्रवणकुमार केसवानी (वय २१, रा. आदर्श नगर) आणि एका अल्पवयीन मुलगा अशा तिघांनी स्टंटबाजी करुन मिरवणुकीतील लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ पुरुषोत्तम वाघळे हे करीत असून संशयितांना सीआरपीसी कलम ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.