पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावातील एका व्यक्तीची स्टेट बॅक क्रेडीट कार्ड विभागातून बोलतोय, अशी थाप मारून ९८ हजार ८९८ रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, नितीन भीमराव मोरे (वय ४२) रा. गिरणा पंपिंग रोड ह.मु.पिंपळगाव हरे यांना दि. २८ ऑगस्ट रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास ८९२६२१७४०२ या नंबरवरून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या भामट्याने स्टेट बॅक क्रेडीट कार्ड विभाग (मुंबई) येथून बोलत असून तुमचे क्रेडीट कार्ड बँकेकडून ब्लॉक करण्यात आले आहे, सांगितले. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP विचारुन नितीन भामरे यांच्या क्रेडीट कार्ड मधुन ९८ हजार ५९८ काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पांडुरंग गोरबंजार हे करीत आहेत.