धरणगाव :प्रतिनिधी
येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल मधील अमन (इ.६ वी) व अयान (इ.८ वी) खाटीक यांनी बनविलेल्या उपकरणाला उच्च प्राथमिक गटातून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळाला. खाटीक बंधूंच्या या यशाबद्दल शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसो गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडियम स्कुल पाळधी येथे काल संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अमन व अयान खाटीक या दोन्ही भावांनी ‘बायो फ्लॉक’ हे उपकरण बनविले होते ज्याच्या माध्यमातून मत्सपालन व्यवसाय आधुनिक व शास्त्रशुद्ध पध्दतीने करण्याबाबत नमूद करण्यात आले होते. जि.प.सदस्य प्रतापराव पाटील व गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांच्या हस्ते अमन आणि अयान यांच्यासह त्यांचे वडील अल्लाउद्दीन खाटीक यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या दोन्ही भावांना विज्ञान शिक्षिका सपना देशमुख (पाटील) यांचे मार्गदर्शन लाभले. उच्च प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळवून उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी अमन व अयान खाटीक यांचा सत्कार केला तसेच शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी अमोल सोनार यांचा तर मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी मार्गदर्शिका सपना देशमुख (पाटील) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी अमन च्या वर्गशिक्षिका अनुराधा भावे आणि अयान चे वर्गशिक्षिक लक्ष्मण पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नर्सरी ते दहावी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी या सर्वांनी अमन व अयान खाटीक या दोन्ही भावांना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सदिच्छा व्यक्त केल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी केले.