मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या १५ दिवसांतच सोने २ हजार ५०० तर चांदीच्या दरात ७ हजार रुपयांनी घसरण झाली.
अनंत चतुर्दशीनंतर सोने खरेदीचा मुहूर्त थेट ५ ऑक्टाेबरला दसऱ्याच्या दिवशीच आहे. त्यामुळे ग्राहकांची पावले सुवर्णपेढ्यांकडे वळली. पक्ष पंधरवडा संपला की साेन्याच्या दरात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी ५५ हजार रुपये एक ताेळा (१० ग्रॅम) या दराने साेने विकले गेले. यंदा त्याहूनही पुढे जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे गणेशाेत्सव काळातच साेन्या-चांदीची ही खरेदी सुरू झाली.
सोने : ५३ हजारांवरून ५१ हजार (प्रतिकिलोचा हा दर आहे)
१३ ऑगस्ट : ५३ हजार २०० १६ ऑगस्ट : ५२ हजार ५०० २२ ऑगस्ट : ५१ हजार ९०० ३१ ऑगस्ट : ५१ हजार ३०० ०१ सप्टेंबर : ५० हजार ९०० ०२ सप्टेंबर : ५१ हजार रुपये
१३ ऑगस्ट : ६१ हजार ५०० १६ ऑगस्ट : ६० हजार रुपये २२ ऑगस्ट : ५७ हजार ५०० ३१ ऑगस्ट : ५५ हजार ५०० ०१ सप्टेंबर : ५४ हजार ५०० ०२ सप्टेंबर : ५५ हजार रुपये