लाईव्ह महाराष्ट्र : जळगाव शहरातील उद्योजन खुबचंद साहित्या यांनी गणेश मुर्तीकारांकडे कोणताही प्रकारे घासाघीस न करता शिल्लक राहिलेल्या सर्व गणेश मुर्ती खरेदी करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिला आहे. त्याच्या या उपक्रमामुळे सर्वत्र कौतूक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील उद्योजक खुबचंद साहित्या यांनी विविध मूर्तीकारांकडे कोणत्याही प्रकारे किंमतीची घासाघीस न करता शिल्लक राहिलेल्या सर्व मूर्ती खरेदी केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी याआधी कधीही गणेशाची स्थापना केलेली नसतांना त्यांनी १००८ लहान, मध्यम व मोठ्या मूर्तींची रक्कम त्या-त्या विक्रेत्याला अदा केली.
या प्रसंगामुळे काही विक्रेत्यांना अश्रू अनावर झाले. कारण, अनेकांनी व्याजावर रक्कमांची उचल केली होती. वॉटरप्रुफ टेंट, वाहतूक इत्यादीवर खर्च झाल्यानंतरचा नफा हा शिल्लक मूर्तींमध्येच होता आणि त्या मूर्ती वर्षभर सांभाळायची, पॅकिंग करुन ठेवायची चिंता होती. संकलित मूर्ती खान्देश मिल कम्पाऊंड परिसरातील संत बाबा हरदासराम मार्केटमधील दुकाने व हॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस सकाळ-सायंकाळी आरती केली जाणार असून, या सर्व मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यात येणार आहेत.