जळगाव प्रतिनिधी : शहरातील भाऊंच्या उद्यानासमोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास शेषराव देशमुख (वय-४९) रा. चंद्रमा अपार्टमेंट रामानंदनगर पोलीस स्टेशनसमोर जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. दरम्यान २७ ऑगस्ट रोजी विलास देशमुख हे त्यांची दुचाकी (एमएच २८ वाय ९३७७) ने काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानासमोर आले होते. त्यांनी भाऊंच्या उद्यानासमोर दुचाकी पार्किंग करून कामानिमित्त निघून गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची ८ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांचे काम आटोपून विलास देशमुख हे परत आल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी मिळाली नाही, गुरुवार १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धावा घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.