पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) चाळीसगाव येथे आयोजित विज्ञात प्रदर्शनात राष्ट्रीय विद्यालय संचलित माध्यमिक विद्यालय पातोंडा शाळेच्या ‘जलविद्युत निर्मिती’ प्रकल्पाला तालुकास्तरावर पहिला क्रमांक मिळाला व जिल्ह्यावर निवड झाल्यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
’49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन”च्या निमित्ताने गुड शेफर्ड अकॅडमी चाळीसगाव येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातुन शेकडो नवनवीन संकल्पना असलेले प्रोजेक्ट, मॉडेल, विद्यार्थ्यांनी मांडले होते. ह्यासोबतच माध्यमिक विद्यालय पातोंडा मा. मुख्याध्यापक एम.बी.विसपुते(अण्णा)ह्यांच्या मार्गदशनाखाली शाळेने 6 वी ते 8वी माध्यमिक गटातून व 9वी ते 12 वी उच्चमाध्यमिक गटातून प्रत्येकी 2 मॉडेल्स ठेवले होते. त्यापैकी मोठ्या गटातून इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “जलविद्युत निर्मिती” प्रकल्पाला तालुकास्तरावर पहिला क्रमांक मिळाला, व जिल्ह्यावर निवड झाली. सर्व विद्यार्थ्यांचे खासदार उन्मेश दादा पाटील तसेच तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण ह्यांनी विशेष अभिनंदन केले. खास बाब म्हणजे दादांनी ह्या अभिनव उपक्रमाबद्दल जाणून घेत विद्यार्थ्यांना अधिकचे मार्गदर्शन करून नवनवीन संकल्पना त्यात करता येऊ शकतात अशा सूचना देत अभिनंदन व कौतुक केले.
ह्याप्रसंगी नन्दकुमार वाळेकर सर BDO, विलास भोई सर गटशिक्षनाधिकारी , श्री.महाजन सर, डॅनियल दाखले, पंकज जी रणदिवे हे उपस्थित होते .प्रकल्पात सर्व सहभागी विद्यार्थी तुषार पाटील ,सुयोग सावळकर ,धनंजय सूर्यवंशी ,मोहन मोकाशे ,लोकेश जाधव ह्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ह्या यशासाठी विज्ञान विषयाचे शिक्षक सागर गोसावी, प्रदीप देसले व विजया पाटील मॅडम ह्यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. गेल्या 8 ते 10 दिवसापासून ह्या उपक्रमांची तयारी म्हणून सागर गोसावी सर व प्रदीप देसले सर ह्यांनी पूर्णवेळ लक्ष दिले होते.