• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या महिलेचा अखेर मृत्यु

editor desk by editor desk
September 2, 2022
in क्राईम, राज्य
0
पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या महिलेचा अखेर मृत्यु

औरंगाबाद : वृत्तसंस्था

घरा शेजारील महिला, तिचा पती, मुलगा सतत त्रास द्यायचे. त्यांना जाब विचारणे सोडून पती शेजारच्या महिलेची बाजू घेऊन आपल्या बायकोलाच त्रास द्यायचा. या सर्वांच्या जाचाला कंटाळून ३४ वर्षीय सविता दीपक काळे या महिलेने गुरुवारी थेट पोलिस आयुक्तालयात जाऊन पेटवून घेतले. आज दि २ रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती गंभीर होती.
सविस्तर वृत्त असे की, ‘माझा नवरा माझी बाजू घेत नाही. तो शेजारच्यांची बाजू घेत हाेता. पोलिस कर्मचाऱ्याची धमकी देऊन तो माझ्यावर दबाव आणत होता. त्यामुळे मी कंटाळले आहे. पोलिसांनी समजूत घालूनही माझा नवरा सुधारला नाही. त्यामुळे मला जगायचाच कंटाळा आलाय. त्यामुळे मी स्वत:ला पेटवून आत्महत्या करते, आता तरी त्या तिघांवर कारवाई करा,’ असा मजकूर टाइप केलेली तक्रार पोलिसांना सविताच्या पर्समध्ये आढळली.
गंभीर भाजलेल्या सविताचा भाऊ श्यामसुंदर काकडे यांनीही या प्रकाराला तिचा पती व पोलिसांना जबाबदार धरले. काकडे म्हणाले, ‘हवालदार गायकेच्या जिवावर संगीता धमकावत होती. पोलिस ठाणे विकत घेईल, इथपर्यंत संगीता बोलायची. गावातील अनेक महिलांना त्यांचा त्रास आहे. मात्र तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मी वाळूजचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांना विनंती केली तर तुम्ही मला कायदा शिकवणार का, असे ते म्हणाले. आम्हालाच मारहाण करून आमच्याविरोधात तक्रारी केल्या.
दीपक सविताचा वारंवार छळ करायचा. त्याच्या या कारनाम्याची दीपकच्या कुटुंबीयांनादेखील कल्पना होती. परंतु त्यांनी मागील काही दिवसांपासून या दोघांकडे दुर्लक्ष केले होते. सविता यांना १७ व १५ वर्षांच्या दोन मुली व ११ वर्षांचा एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी पतीच्या मारहाणीला कंटाळून ती भावाकडे गेली होती. पण तिन्ही मुले मांडवा गावातच हाेती. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर भाजलेल्या सविताचा जवाब नोंदवला. त्यातही तिने संगीता शेळके, त्यांचा मुलगा, पतीकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पुनरुच्चार केला आहे.
गंभीर भाजलेल्या सवितावर घाटीत उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांच्या माहितीनुसार, सविता ७० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने मात्र वाळूज पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सविता यांनी पेटवून घेतल्यानंतर दुपारी आरोपी संगीता व इतरांना ठाण्यात बोलावण्यात आले होते. अदखलपात्र गुन्ह्यातील प्रतिबंधात्मक कारवाईत केलेला बाँड रद्द करण्यात येत असल्याची नोटीस आरोपींना बजावण्यात आली. परंतु यापूर्वीच कठोर कारवाई का केली नाही, असा प्रश्न सविताच्या नातेवाइकांनी केला आहे.
सविता व त्यांच्या भावाने संगीता व इतरांविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी केल्या. त्यानुसार २७ मे, ३ जून, २४ ऑगस्ट, ३० ऑगस्ट रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला. पण प्रत्येक गुन्ह्यानंतर आरोपी सविताला धमकावून मारहाण करत होते. त्यामुळे सविता खचली होती. भेटायला आलेल्या तिच्या भावालाही मारहाण झाली. परंतु वाळूज पोलिसांनी केवळ कागदी प्रक्रिया पार पाडल्या. दरम्यान, या प्रकरणातील सर्व गुन्हे हे जामीनपात्र असल्याने आरोपींना अटक करता येत नाही, असा बचाव आता वाळूजचे पोलिस अधिकारी करत आहेत.

Previous Post

आता नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोहोर

Next Post

पातोंडा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा 

Next Post
पातोंडा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा 

पातोंडा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group