नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना नाशिकमध्ये मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सिन्नरला ढगफुटी सदस्य पाऊस झाल्याने संपूर्ण गावांची आणि तालुक्यांची दाणादाण उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
रात्री पाण्याखाली गेलेल्या तालुक्यांमधील पुलांवरून पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे. सिन्नरच्या देवपूर रस्त्यावरील देवनदीवरील पूलदेखील वाहून गेल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहे.
पूल वाहून गेल्याने मोठा ट्रक पाण्यात अडकला असल्याची माहिती तर यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागांमध्ये पाऊस आहे तर काही भागांमध्ये पावसाची उघडीप आहे. अशात नाशकात मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईनाका, शालिमार, सीबीएस, जुने नाशिक, रामकुंड, राणे नगर, पंचवटी भागात अवघ्या १५ मिनिटं झालेल्या पावसात रस्ते पाण्याखाली गेले होते. पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला तर ६ चारचाकी ते १८ मोटारसायकल वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक कुटुंबांना JCB वर बसवत रेस्क्यू केलं जात आहे.