मुक्ताईनगर : प्रतिनिधी
फायनान्स कंपनीची तब्बल ६६ लाख ६६ हजार ९२४ रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील राजेंद्र सावकारे (रा.राज शाळेजवळ एमआयडीसी कॉलंनी, जळगाव), अवधूत ज्ञानेश्वर सोनवने (रा. रेलगाव फुलब्री, जि. औरंगाबाद) आणि पंकज रामधन वानखेडे (रा. शेळगाव ता.चिखली, जि.बुलढाणा) असे संशयित आरोपींचे नावं आहेत.
सविस्तर वृत्त असे की, एकनाथ भिमगिर गोसावी (वय ३२, धंदा नोकरी : शाखा व्यवस्थापक मुक्ताईनगर, भारत फायनान्स व इंडिया बुल्स सेंटर, रा. अहिल्यादेवी चौक, चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारत फायनान्स इंन्क्लयुजन लिमिडेड, शाखा मुक्ताईनगरमध्ये दिनांक १ सप्टेंबर २०२१ ते १५ मे २०२२ या कालावधीमध्ये संगम व्यवस्थापक (फिल्ड असिस्टंट) म्हणून कार्यरत असलेले निखील राजेंद्र सावकारे, अवधुत ज्ञानेश्वर सोनवणे आणि पंकज रामधन वानखेडे यांनी कंपनीचे सदस्य असलेले एकूण २४७ सदस्यांचे नावे बायोमॅक्ट्रीक पद्धतीचे कर्ज मंजूर करुन घेत सदस्यांचे अंगठे घेऊन कर्जदार यांना वाटप केल्याचे भासवले. त्यानंतर ती रक्कम स्व:ता उचल करुन घेत कंपनीची व साक्षीदार यांची फसवणुक केली. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि प्रदिप शेवोळे हे करीत आहेत.