• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.उल्हास पाटील

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 27, 2021
in जळगाव, राजकारण
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.उल्हास पाटील

जळगाव – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी गुरुवारी जाहिर करण्यात आली. यात काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ.उल्हास पाटील यांच्या निवडीमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आक्रमक चेहरा म्हणून आमदार नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सूत्रे सोपविण्यात आली. प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी जिल्हानिहाय दौरे करुन संघटनात्मक आढावा घेतला. गुरुवारी दि.२६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली, या बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यकारिणीवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले, त्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने मंजूरी दिल्यानंतर हि कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. यात १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस आणि १०४ चिटणीस अशी जंबो कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
जळगाव जिल्ह्याला प्रदेशावर मान
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी निवडणूकांच्या दृष्टीने डॉ.उल्हास पाटील यांची नियुक्‍ती महत्वाची मानली जात आहे.
काँग्रेसला पुन्हा गत वैभव मिळवून देणार – डॉ.उल्हास पाटील
जळगाव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला राहिला आहे. आगामी निवडणूकामध्ये काँग्रेस पक्षाला अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात येणार आहे. गाव तेथे काँग्रेस हि संकल्पना घेऊन काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न राहिल अशी ग्वाही नवनियुक्‍त प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी दिली.

Previous Post

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group