जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेंदुर्णी येथील जिनिंगची मिलची तपासणी करण्यास गेलेल्या कृषी अधिकाऱ्यास मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कन्हाया प्रकाश महाजन (वय ३८, धंदा – नोकरी तालुका कृषी अधिकारी जामनेर रा.हिंगणे) हे दि.३१ ऑगस्ट रोजी शेंदुर्णी येथील गोविंद कोटेक्स मिलची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी नितीन गोविंद अग्रवाल, गोविंद अग्रवाल, निलेश गोविंद अग्रवाल (रा.शेदुर्णी ता.जामनेर) या दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन कृषीअधिकारी श्री. महाजन यांच्या अंगावर धावून गेलेत. तसेच चापटा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. जिनिंगमध्ये आलाच कसा?, आमच्या जिनिंगमध्ये महीला असतात, पैसे पडलेले असतात. तू कशी नोकरी करतो? असे म्हणत तुझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करुन तूला नोकरी वरुनच काढतो. एवढेच नव्हे तर तुला जिवंत ठेवणार नाही धमकी दिली. यानंतर कृषीअधिकारी श्री. महाजन यांनी अग्रवाल बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहेत.