जळगाव : प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आणि चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाच्या कारवाईत गावठी कट्टा बाळगणा-यास अटक करण्यात आली आहे. युवराज कडू होंडाळे (रा. नशिराबाद ता. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
30 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत एक गावठी कट्टा, चार काडतुस आणि गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलसह संशयित आरोपी युवराज होंडाळे यास अटक करण्यात आली आहे. त्याने पार उमर्टी ता. वरला जिल्हा बडवाणी (मध्यप्रदेश) येथून गावठी कट्टा आणला होता. एकुण 94 हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीस चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. देविदास कुनगर यांच्यासह त्यांचे सहकारी हे.कॉ. राकेश पाटील, हे.कॉ. शिंगाणे, संजय येंदे तसेच विशेष पथकातील सहायक फौजदार बशीर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.