पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील एका ३० वर्षीय तरूणाने घरासामोरील अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली.पाचोरा शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला.
याप्रकरणी पिडित बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत पाचोरा पोलिसात भाग – ०५ गुरन ३९९ भा.द.वी. ३७६अ, ब, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात नमुद करण्यात आले आहे की, पिडित बालिका संशयित आरोपीच्या घरी दुपारी त्याच्या मुलीसोबत खेळण्यास आली असता तिला लज्जा निर्माण होइल असे कृत्य केले. दरम्यान, आरोपी तरुणाला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले होते. पुढील तपास पोलिस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.