जळगाव : प्रतिनिधी
वेश्याव्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलीची विक्री तसेच बळजबरी विवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील येथील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख संशयीत आरोपी महिलेने पिडीत अल्पवयीन मुलीला तिच्या दिर व दिराणी तसेच दिराचा शालक अशा तिघांना वेश्याव्यवसायासाठी विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील संशयीत आरोपी असलेल्या महिलेच्या दिराच्या शालकासोबत बळजबरी बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिडितेने फिर्यादीत केला आहे. 23 ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडलेल्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे हे करत आहेत. संशयितांना अद्याप अटक करण्यात आली नसून पोलिस त्यांच्या मागावर असल्याचे कळते.