धरणगाव : प्रतिनिधी
येथील श्री जिनिंग मध्ये आज गणेश चतुर्थीच्या मुहर्तवर कापूस खरेदीला प्रारंभ झाला. मुहर्तचा भाव ११ हजार १५३ रुपये श्री जिनिंग मध्ये प्रति क्विंटल भाव देण्यात आला. दरवर्षी प्रमाणे धरणगाव तालुक्यातील जीनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहार्तवर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी खरेदीचा शुभारंभ काटा पूजन करून करण्यात आला. श्री. जिनिंग मध्ये काटा पूजन नयन शेठ गुजराथी, जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, सागर कर्वा, प्रवेश गुजराथी, निखिल बयस, नीलेश चौधरी या संचलकाच्या हस्ते करण्यात आले. मुहूर्तावर पहिल्याच दिवशी साधारण क्विंटल कापूसची आवक साधारण २ हजार क्विंटल श्री जिनिंगमध्ये होती. स्थानिकपेक्षा आंध्रप्रदेशमधील आवक सर्वाधिक होती. कापूस खरेदीच्य या उद्घाटन समारंभास राकेश चौधरी, गजानन साठे, किरण अग्निहोत्री, मनोज बोरसे यांच्यासह परिसरातील जिनिंग उद्योजक, अंजनी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन साठे,चेतन गुजराथी यांच्यासह श्री जिनिंगचे व्यवस्थापनाने परिश्रम घेतले. उपस्थित शेतकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.