Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » …चक्क टॉयलेटमध्ये लाच स्विकारताना अधिकाऱ्याला पकडले
    क्राईम

    …चक्क टॉयलेटमध्ये लाच स्विकारताना अधिकाऱ्याला पकडले

    editor deskBy editor deskAugust 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    नाशिकच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून लाचखोरीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक हात धुवून मागे लागल्याने आदिवासी विकास भवनातील एका अधिकाऱ्याने चक्क टॉयलेटमध्ये लाच स्वीकारली. गमंत म्हणजे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून तरीही या अधिकाऱ्याला पकडले आहे.

    काही दिवसांपूर्वीच आदिवासी विकास विभागाचे मुख्यालयात एका एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुलला 28 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे. प्रताप वडजे असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. वडजे हा आदिवासी विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत आहे. रोजंदारीवरील पद स्वयंपाकी किंवा कामाठी करण्याच्या मोबदल्यात या वडजेने लाच मागितली होती.

    तक्रारदाराच्या पत्नीचे रोजंदारीवरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असे आदेश काढले होते. त्या कामाठी किवा स्वयंपाकी असं नव्याने आदेश बदलून देण्याची विनंती केली होती. या कामाच्या मोबदल्यात 10 हजार रुपये लाचेची मागणी वडजे याने केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. ठरल्यानुसार, 29 ऑगस्ट रोजी वडजे याने पैसे घेऊन बोलावले आणि टॉयलेटमध्ये त्याने 10 हजार स्विकारले. पण आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. वडजेला 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.