मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह प्लॉस्टिकच्या पिशवीत बांधून फेकून दिल्याचा ध्ककादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसर हादरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर ते बर्हाणपूर महामाार्गवर संतमुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणार्या पुलाच्या खालील बाजूला आज सोमवारी २९ ऑगस्ट रोजी एका महिलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. विशेष बाब म्हणजे तिची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या पिशवती भरून तिथे टाकल्याचे आढळून आले. संबंधीत महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पंचानाम्याला सुरूवात करण्यात आली आहे. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.