देशाच्या परकीय चलन बाजाराच्या आकडेवारीनुसार बाजार उघडताच रुपयाने घसरण दाखवण्यास सुरुवात केली. डॉलरच्या तुलनेत रुपया खालच्या स्तरावर घसरला आहे. ऐतिहासिक घसरणीसह रुपया 80 रुपये पार करून 80.11 पैशांवर घसरला आहे
शुक्रवारी डॉलरचा भाव 79.87 पैसे होता. आज बाजार उघडताच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 80.11 रुपयांवर पोहचला आहे. शुक्रवारच्या तुलनेत 21 पैशांची घसरण नोंदवली गेली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत कमालीची घरसण झाली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया सर्वात नीचांकी स्तरावर गेला आहे. रुपयाच्या सततच्या घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलरचे वर्चस्व आणि भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांची माघार यामुळे रुपयावर दबाव वाढत आहे. 2022 मध्येच डॉलरच्या तुलनेत रुपया 7 टक्क्यांनी घसरला आहे.
Rupee hits record low of 80.11 against the previous session close of 79.87 on Friday (26th Aug)
(Representative image) pic.twitter.com/JGNcyHnczJ
— ANI (@ANI) August 29, 2022
रुपयाच्या घसरणीचा कोणाला बसणार आधिक फटका
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग होईल, कारण भारतीय आयातदारांना आता डॉलरच्या तुलनेत अधिक रुपये खर्च करावे लागतील.त्याचबरोबर भारत कच्च्या तेलाच्या एकूण वापरापैकी 85 टक्के आयात करतो, ज्यामुळे डॉलर महाग होईल आणि त्यावर दबाव येईल.इंधन महाग झाल्यास मालवाहतुकीचा खर्च वाढेल, ज्यामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढतील आणि सर्वसामान्यांवर महागाईचा बोजाही वाढेल.परदेशात शिक्षण घेणाऱ्यांवरही याचा परिणाम होईल आणि त्यांचा खर्च वाढेल, कारण आता त्यांना डॉलरच्या तुलनेत अधिक रुपये खर्च करावे लागतील.