जळगाव : प्रतिनिधी
जैन स्पोर्टस अॅकडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम स्पर्धेत मुलींच्या गटात विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिने कुणालाही एकही गुण न मिळू देता एकतर्फी विजय मिळवित अंतिम फेरीत अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलच्या पुर्वी भावसार हिचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.
तसेच मुलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलचा पियुष भुईकर याने रायसोनी पब्लिक स्कूलच्या ऋतिक अग्रवालचा पराभव करून विजेते पद प्राप्त केले. मुलींमध्ये् विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या श्रावणी मोरे आणि पुर्वा भुतळा यांनी तसेच मुलांमध्ये अॅंग्लो उर्दू हायस्कूलचा माज पठाण आणि रायसोनी पब्लिक स्कूलचा महर्षी जोशी यांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. ह्या सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना जैन स्पोर्टस अॅकडमी व जैन इरिगेशन सिस्टिम्स तर्फे चषक, प्रमाणपत्र, कॅरमचे स्ट्राईकर व सोंगट्या व्यापारी महामंडाळाचे उपाध्यक तथा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्य युसूफ मकरा आणि जैन स्पोर्टस् अॅकडमीचे मुख्य प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद मोहसीन यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून आयशा खान, सय्यद जुबेर,योगेश धोंगडे यांनी काम यशस्वीतेसाठी सहकार्य केले