Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
    क्राईम

    मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

    editor deskBy editor deskAugust 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील अभोणे गावात दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बैल पूजनाची लोखंडी पास डोक्यात घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दि. 26 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील अभोणे गावात बैल पोळा सण उत्साह साजरा केला असताना दुसरीकडे अवघ्या तालुक्याला हादरवणारी घटना घडली. मोठा भाऊ पिंटू तुकाराम पाटील (३८) व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील (३२) हे घरी बैल पूजनासाठी आले. लहान भाऊ शिवाजी पाटील याने दारूच्या नशेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, लहानभाऊ शिवाजी पाटील याने मोठ्या भाऊच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. यानंतर वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले. दारापुढे बैल पूजनाची तयारी सुरू असताना हा वाद सुरू होता, जवळच बैल पूजनासाठी लोखंडी पास ठेवण्यात आली होती, मोठा भाऊ पिंटू तीच पास घेऊन, लहान भाऊ शिवाजी यांच्या डोक्यावर तीन वार केले, डोक्यावर जोरदार प्रहार झाल्यामुळे लहान भाऊ शिवाजी जागीच गतप्राण झाले. त्याला तात्काळ चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. प्राप्त माहितीनुसार दोघे भाऊ दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.