नगराध्यक्षांच्या दालनात तासभर ठिय्या मांडून बांगड्या फोडून निषेध
धरणगाव ;- येथील माजी नगरसेविका नर्मदाबाई एकनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रभाग क्र.५, लोहार गल्ली परिसरातील संतापलेल्या महिलांनी पाणी प्रश्नी नगरपालिकेवर मोर्चाकाडून नगराध्यक्षांच्या दालनात तासभर ठिय्या मांडून आणि बांगड्या फोडून निषेध करून आपला संताप व्यक्त केला .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतप्त झालेल्या महिला भगिनी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या दालनात तब्बल एक तास ठिय्या मांडून होते. जोवर नगराध्यक्ष येत नाही आणि आमच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत आम्ही दालनातून निघणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी यावेळी घेतला
नगराध्यक्षांच्या दालनात आलेल्या मोर्चेकरांचे प्रभाग क्र. १० चे नगरसेवक अजय जंगलू चव्हाण यांनी पाणी प्रश्न संदर्भात ऐकूण घेतले. व लवकरच आपणास पाणी वाढवून मिळेल म्हणून प्रयत्न करणार असे ढ़वसं दिले . सकाळी ११ वाजेपासून ते १ वाजेपर्यंत मोर्चातील महिला व नागरिक हैराण झाले. धरणगाव नगरपालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार, नगराध्यक्ष निलेश चौधरी व प्रभाग ५ चे नगरसेवक भालचंद्र जाधव, नगरसेविका शोभा राजपूत यापैकी कोणीही उपस्थित झाले नाही. त्यामुळे या सर्व संतप्त महिलांनी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या दालनात व न.पा. च्या आवारात हातातील बांगड्या दाखवीत आणि बांगड्या फोडून आपला निषेध नोंदवला. या प्रसंगी असंख्य महिला भगिनी तसेच किरण वऱ्हाडे, टोनी महाजन, विकास चौहान, हरीश माळी, दयाराम माळी, गोपाळ लोहार, हर्षल माळी आदी उपस्थित होते.
तसेच प्रभाग क्र.५ च्या संतप्त महिलांनी सांगितले की, धरणगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी व अंजनी नदी भरभरून वाहत असून सुध्दा लोहार गल्ली परिसराला २३ दिवसापासून पाणीपुरवठा झालेला नव्हता आज रोजी फक्त एक तास पाणी सोडल्यामुळे या महिला भगिनींचा संताप अनावर झाला.