स्त्रिया आणि लहान मुलींवरीवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढत चालले आहे. गुन्हेगारांच्या मानसिकतेत कुठलाही बदल होत नसल्याचे दिसते. आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना वर्धा शहरत 25 रोजी घडली आहे. 70 वर्षीय नराधम आजोबाने अवघ्या 7 वर्षीय चिमुकल्या नातीवर अत्याचार केला आहे.रामनगर पोलिसांनी याप्रकारणी नराधम आजोबाला अटक केली आहे.
सात वर्षीय मुलगी रामनगर हद्दीत तीच्या आईच्या आई वडीलांकडे राहत आहे. महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. 25 रोजी रात्रीच्या सुमारास सगळे घरी असताना अचानक चिमुरडीच्या आजीचा ओरडण्याचा आवाज आला. चिमुरडीच्या आईने धाव घेतली असता आपल्याच पोटच्या मुलीवर वडिलांना अत्याचार करताना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
नराधम 70 वर्षीय आजोबा त्याच्या खोलीत चिमुरडीशी अनैसर्गिक कृत्य करताना दिसला. महिलेने थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ वासनांध आजोबास अटक केली.हेमंत चांदेवार यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.