नागपूरच्या बुट्टीबोरी ते गुमगाव येथे किरकोळ वादातून रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाला धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या शेख अकबर या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
अकबर नावाचा प्रवासी नागपूरकडे निघाला होता. जनरल डब्ब्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने हे सर्व तरूण दराजवळ उभे होते. रेल्वे प्रवासात अकबरचा पाय दुसऱ्या प्रवाशाला लागला. बाचाबाचीत वाद टोकाला पोहोचला संतप्त प्रवाशाने अकबरला धावत्या ट्रेनमधून फेकून दिले. यामध्ये अकबर याचा मृत्यू झाला असून, अकोल्यातील काही तरूण नागपूर येथील उरुसासाठी गरिबरथ रेल्वेने निघाले होते. ही बाबत अकबर याच्या सोबत असलेल्या मित्रांनी रेल्वे पोलिसांना दिली असता पोलिसांनी तपासाची सूत्र हलवत एका संशयिताला एटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.