उत्तर प्रदेशातील शाहजहापुरमध्ये डिलिव्हरी बॉयने फाटलेली नोट घेण्यास नकार दिला हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सचिन कुमार हा टाऊन हॉलच्या विलंका कॅफैमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. कॅफेमध्ये काम करणाऱ्या पिझ्झा-बर्गरच्या ऑर्डरची डिलिव्हरी पोहोचविण्यासाठी तो ग्राहकाच्या घरी पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत सहकारी रितिकदेखील होता. दोघेही बुधवारी रात्री 12 वाजता जलालनगर निवासी नदीमच्या घरी डिलिव्हरी देण्यासाठी पोहोचले. रितिकने दिलेल्या माहितीनुसार, सचिनला डिलिव्हरीचे 197 रूपये घ्यायचे होते. आरोप आहे की, नदीमने त्याला 200 रुपयांची फाटलेली नोट दिली. फाटलेली नोट घेण्यास नकार दिल्यानंतर नदीम आणि त्याचा भाऊ संतापले. दोघेही शिवीगाळ करू लागले.
हे पाहून सचिन विरोध करू लागला. ज्यानंतर नदीमने सचिनच्या पाठीवर गोळी झाडली. यावेळी रितिक सुदैवाने बचावला. हल्लेखोर फरार, पोलिसांकडून शोध सुरू. घटनेनंतर पोलिसांनी जखमी सचिनला रुग्णालयात दाखल केलं. येथे त्याची प्रकृती पाहून मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.



