Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
    क्राईम

    हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 26, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी;– तालुक्यातील शिरसोली गावात तलवार घेऊन दहशत माजविणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    साहिल रज्जाक पिंजारी वय १९ रा. चिंचपुरा चौक शिरसोली असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४ हजार रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली.

    हनुमान मंदिराजवळ साहिल पिंजारी हा बुधवारी दुपारी हातात तलवार घेऊन गावात दहशत माजवित असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी यांच्यासह पथकाने शिरसोलीतुन साहिल पिंजारी यास अटक केली. त्याच्याकडून ४ हजार रुपये किंमतीची २९ इंच लांब व २३ इंच रुंदीची तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद लाडवंजारी यांच्या फिर्यादीवरून साहिल पिंजारी याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.