मंत्रीपद मिळवण्यासाठी गद्दारांची माझ्याविरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मंत्र्यांना बंगले दिलेत जिल्हे का नाही? . पालकमंत्री आज गरजेचे पण गद्दार सरकारचं लक्ष स्वतःवरच आहे जनतेवर नाही, अशी सडकून टीका देखील आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर सुरू असलेल्या शिंदे गटाच्या बॅनेरबाजीवर आदित्य ठाकरे विधानभवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलत होते. आमच्या झालेल्या कामांच्या चौकशीवर भाष्य करताना दिलखुलासपणे चौकशी करा आनंद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या बाळासाहेबांच्या मुलाने सर्व काही दिलं त्याच्या पाठित खंजीर खुपसायचा. त्यामुळे यांच्यासाठी ‘गद्दार’हा शब्दच योग्य आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे आदित्य ठाकरें म्हणाले, हे सरकार स्थापन झालं तेव्हा दोन जण मंत्री झाले. मंत्री ठरवायला ४२ दिवस लागले. पण जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाही. खोके ओके हे काही झोमण्यासारखं नाही. मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नाही. या आमदावर कुणाचा अंकुश नाही. ४० जणांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकांना सामोरे जावं असेही ते म्हणाले.सत्ताधाऱ्यांनी आमचा आवाज दाबण्याचा, आम्हाला कितीही संपविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढत राहू. हे सरकार फक्त स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीका आदित्य यांनी केली.