केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्रान्सजेंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ट्रान्सजेंडरलाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे . केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सांगितले की, देशभरात सुमारे ४लाख ८९ हजार ट्रान्सजेंडर असून या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
यासाठी नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधानांची विचारसरणी सर्वांच्या विकासासोबत असून समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. योजना भारत सरकारची आरोग्य विमा संरक्षण योजना आहे. आयुष्मान भारत योजना केंद्र सरकारने 2018 मध्ये सुरू केली होती. परंतु आता यात बदल करून तृतीय पंथाना यांचा लाभ घेता येईल.
18 वर्ष पूर्ण झालेला कोणताही नागरिक आयुष्मान भारत हा योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज करू शकतात. आपण जर स्वतः अर्ज करत असेल तर SECC-2011 च्या यादीत आपले नाव असावे. सेंट्रल सोशल वेलफेअरमध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व ट्रान्सजेंडर्सना फक्त त्यांचे आधार कार्ड घेऊन केंद्रात जावे लागेल . येथून नोंदणीकृत ट्रान्सजेंडरला त्यांचे आयुष्मान कार्ड मिळेल. ते हे कार्ड देशात कुठेही वापरू शकतात. यासोबतच, जर ट्रान्सजेंडरची नोंदणी समाज कल्याण मंत्रालयात नसेल, तर प्रथम नोंदणी केल्यानंतरच हे कार्ड बनवले जाई.