अमळनेर : प्रतिनिधी
तुम्हाला ‘फोन पे’ बॅकेची ऑफर असल्याचे सांगत एका भामट्याने अमळनेरच्या व्यक्तीला ५० हजाराचा गंडा घातला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात रविद्र दगा चौधरी (रा.एलआयसी कॉलोनी सम्राट हॉटेल मागे, अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ रविद्र चौधरी हे आपल्या घरी होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर ९८८३१२५६०५ या नंबरवरून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने श्री. चौधरी यांना सांगितले की, तुम्हाला ‘फोन पे’ बॅकेची ऑफर आहे. तरी तुम्ही मी सांगतो तशी प्रक्रीया करा. त्यानंतर त्याने श्री. चौधरी यांना फोनवर एक लिंक पाठवली. त्यानंतर त्या भामट्याने लिंकवर क्लीक करा व तुम्हाला तो ओटीपी येईल, तो ओटीपी मला सांगा आणि मग तुम्हाला कँश बँक मिळेल, असे सांगितले. थोड्याच वेळात श्री. चौधरी यांच्या खात्यातून ६ हजार ८८२ रुपये व दुस-या दिवसी ४३ हजार ६६५ असे एकूण ५० हजार ५४८ रुपये कपात झाले. त्या दिवशी रविवार असल्यामुळे रवींद्र चौधरी बँके बंद होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी खाते बंद केले. याप्रकरणी ९८८३१२५६०५ या मोबाईल धारक अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.