जळगाव : प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात जिल्हा दुध संघाच्या प्रशासक मंडळ व संचालक मंडळाचे वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत गेले होते, त्यानंतर जिल्हा सहकारी दूध संघात प्रशासक मंडळ आणि संचालक मंडळ यांच्यात सुरू असलेल्या दाव्यांबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आता येत्या शुक्रवारी कामकाज हाेणार आहे.
दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश शासनाकडून काढण्यात आले हाेते. दरम्यान, संचालक मंडळाने प्रशासक मंडळ नियुक्तीविराेधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. प्रशासक मंडळाने घेतलेला पदभार बेकायदेशीर असल्याचा दावा संचालकांनी केला आहे. दरम्यान, या विषयावर न्यायालयीन कामकाज सुरू आहे. बुधवारी या विषयावर सुनावणी हाेणार हाेती; परंतु आता शुक्रवारी म्हणजे २६ आॅगस्ट राेजी न्यायालयात या याचिकेवर कामकाज होईल.जिल्हा दूध संघातील गैरव्यवहारांबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन शासनाने चाैकशी समिती नियुक्ती केली आहे. या समितीने बुधवारी तक्रादार एन.जे. पाटील यांचीदेखील चाैकशी केली. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली.