Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जयंती उत्सव : धरणगाव शहरात जिवाजी सेनेतर्फे‎ संत सेना महाराज यांना अभिवादन‎
    जळगाव

    जयंती उत्सव : धरणगाव शहरात जिवाजी सेनेतर्फे‎ संत सेना महाराज यांना अभिवादन‎

    editor deskBy editor deskAugust 25, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    ‎ तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे संत सेना‎ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त‎ समाज बांधव व भजनी मंडळातर्फे‎ संत सेना महाराज यांना अभिवादन‎ करण्यात अाले.‎ प्रारंभी गावातून संत सेना महाराज‎ यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात‎ आले होते. या दिंडी द्वारे गावात‎ सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात‎ आला. या प्रसंगी पिंप्री येथील नाभिक‎ समाजाचे अध्यक्ष राजेंद्र बोरसे, सर्व‎ सदस्यांसह अरुण चित्ते, नाना‎ सूर्यवंशी, रमण बोरसे, बापू महाले,‎ देविदास सोनगिरे, संतोष सोनावणे,‎ संतोष सोनगिरे, जयेश सोनगिरे, राजेंद्र‎ सोनवणे, हिंमत सोनवणे, एकनाथ‎ सोनगिरे, नवल सोनगिरे, गजानन‎ बोरसे, नीलेश सोनगिरे, दादा निकम‎ यांच्यासह सर्व नाभिक समाजबांधव‎ उपस्थित होते.‎

    धरणगाव‎ येथील अखिल भारतीय जिवाजी‎ सेनेच्या वतीने आज वारकरी‎ संप्रदायातील महान संत श्री संत सेना‎ महाराज यांची पुण्यतिथी साजरी‎ करण्यात अाली. यानिमित्त अभिवादनपर‎ कार्यक्रम घेण्यात आला.‎ जिल्ह्याचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी.‎ एन. खोंडे यांच्या मार्गदर्शनात व‎ तालुकाध्यक्ष रवींद्र निकम, शहराध्यक्ष‎ अमोल महाले यांच्या नेतृत्वात विविध‎ कार्यक्रमांचे अायाेजन केले हाेते. यात‎ जिवाजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून‎ वारकरी शिक्षण संस्थेतील‎ विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली‎ हाेती. वारकरी शिक्षण संस्थेत घेण्यात‎ आलेल्या या कार्यक्रमास महंत‎ भगवानदास महाराज अध्यक्षस्थानी होते.‎ या वेळी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, माजी‎ जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, प.‎ रा. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण‎ कुळकर्णी, व्ही. टी. गालापुरे, सचिव डॉ.‎ मिलिंदकुमार डहाळे, प्रा. सी. एस.‎ पाटील, प्रा. बी. एल. खोंडे, राजेंद्र‎ फुलपगार, जगन्नाथ फुलपगार, अशोक‎ झुंझारराव, दीपक झुंझारराव आदींसह‎ राजकिय, सामजिक व शैक्षणिक क्षेत्रात‎ कार्य करणाऱ्या मान्यवरांनी संत सेनाजी‎ महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण‎ करुन अभिवादन केले. या प्रसंगी रवींद्र‎ निकम, अमोल महाले, निंबा निकम,‎ जगन्नाथ पुलपगार, डिगंबर निकम,‎ सचिन झुंजारराव, सुधाकर फुलपगार,‎ देवा निकम, गोरख फुलपगार, शिवा‎ निकम आदींनी सहकार्य केले.‎

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025

    युगेंद्र पवारांच्या लग्नात ‘आत्याबाई’ सुप्रिया सुळे रंगल्या सणसणीत ठेक्यावर

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.