देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी 46 हजार 280 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 34 हजार 242 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 605 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 56 दिवसानंतर कोरोनाच्या नवीन प्रकरणात वाढ झाली आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी 46 हजार 781 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
तर दुसरीकडे, केरळ राज्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. राज्यात बुधवारी 31 हजार 445 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, 20 हजार 271 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 215 लोकांचा मृत्यू आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 19.03 टक्के आहे.
देशात कोरोना महामारीचे आकडे
मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 46,265
मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 34,242
मागील 24 तासात एकूण मृत्यू : 605
आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.25 कोटी
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.17 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.36 लाख
सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 3.27 लाख