नाशिक शहरातील सिन्नर गावठा परिसरातील विठ्ठलेश्वर मंदिराजवळ जुगार खेळत असताना मंगळवारी (दि. 23)पोलिसांनी पाच जणांवर सिन्नर कारवाई केली. कारवाईत सुमारे 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
नाशिक मधे गावठा परिसरातील विठ्ठलेश्वर मंदिराजवळ पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. या महेंद्र वायचळे यांच्याकडून 1700 रुपये, अविनाश गवळी यांच्याकडून 1200 रुपये, गणेश लोणारे यांच्याकडून 900 रुपये, विलास पाचोरे यांच्याकडून 1300 रुपये, आतिष भाटजिरे यांच्याकडून 1100 रुपये असा 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमल, 52 पत्त्यांचे घोड्याचे चित्र असलेले मोकळे पाने पोलिसांनी जप्त केली. याबाबत पोलिस शिपाई बाळू साळवे यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.