नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथील आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा होऊन मतिमंद मुलांच्या आश्रम शाळेतील काही त्यातून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. अन्य चार मतिमंद विद्यार्थी गंभीर असल्याचे समोर आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथील मतिमंदांचे निवासी आश्रमशाळेत काल रात्रीच्या जेवणात त्यांना खिचडी देण्यात आली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला तेथील विद्यार्थ्यांना अस्वस्थ वटू लागले. त्रास झालेल्या विद्यार्थ्यांना इगतपुरीच्या रूग्णालयात नेण्यात आले. तेथे दोन मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही विषबाधा नेमकी कशातून झाली हे अजून समजलेले नाही. अन्न किंवा पाण्यातून त्यांना ही बाधा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.