• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही ; खडसेंचा सवाल

editor desk by editor desk
August 24, 2022
in क्राईम, जळगाव, राजकारण, राज्य
0
हेतपुरस्कार अडकविण्याचा प्रयत्न ; खडसेंचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई : वृत्तसंस्था

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावर विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हाव, असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. चार दिवस वादळी ठरले. पाचवा दिवस वादळी ठरणार अशी अपेक्षा होती. आज सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले. सुरुवातीला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामध्ये पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सत्ताधारी देखील आक्रमक झाले. सत्ताधारी आमदारांकडून लवासातील खोके सिल्वह ओक ओक्के, वाझेचे खोक्के मातोश्री ओक्के अशा घोषणा देण्यात आल्या. या सर्व राड्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये चांगलीच जुंपली नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं देखील पहायला मिळालं. यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे. एकोंमेकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे हे काय योग्य नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

गेले चार दिवस विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. मात्र आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी देखील तयारीत होते. विरोधकांनी घोषणाबाजी सुरू करताच भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांकडून देखील घोषणाबाजी सुरू करण्यात आली. ज्यामध्ये वाझेचे खोके मातोश्री ओके, लवासाचे खोके सिलव्ह ओक ओक्के अशी घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांकडून सुरू करण्यात आली. सत्ताधाऱ्यांकडून देखील घोषणाबाजी सुरू झाल्याने वातावरण चांगलेच तापले.

Previous Post

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले

Next Post

महिलेने गमावले तब्बल 21 लाख रुपये ; कारण वाचून व्हाल थक्क

Next Post
महिलेने गमावले तब्बल 21 लाख रुपये  ; कारण वाचून व्हाल थक्क

महिलेने गमावले तब्बल 21 लाख रुपये ; कारण वाचून व्हाल थक्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group