वर्ड व्हिजन इंडियाचा उपक्रम
धरणगाव (प्रतिनिधी ) – येथील तालुक्यातील असलेली पोखरी तांडा या गावात मागील बऱ्याच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जाणवत होती होती.
ग्रामस्थ शेतातील पाणी हंड्यात भरून स्वतः डोक्यावर वाहत घरी आणत. हे पाणी खाजगी विहीर आणि खाजगी बोअरवेल मधून आणत असत.
पाणी लांब अंतरावरून आणत असल्यामुळे दिवसाचा बराच वेळ पाणी वाहण्यात जात असे म्हणून रोजगाराची देखील समस्या निर्माण झाली होती.
वर्ल्ड व्हिजन इंडिया मागील दोन वर्षांपासून या गावांमधे गरीब कुटुंबांतील मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कार्यक्रम हाती घेवून राबवत आहे. मुलांच्या आरोग्यासाठी विविध कार्यक्रम जसे, पोषण आहार, मुलांची सुरक्षा विषयी जनजागृती, महिला सबलीकणासाठी आणि कोविड १९ विषयी जनजागृती आदी विविध प्रकारच्या कार्यक्रमाद्वारे शासानासोबत मिळून कार्य करत आहे.
पोखरी आणि तांडा आणि पोखरी येथील पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून ग्रामवासी यांच्या विनंती अनुसार वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेमार्फत दोन बोअरवेल करून देण्यात आले. या बोअरवेल द्वारे पोखरी आणि पोखरी तांडा येथील ३२५ कुटुंबांना पिण्याचा लाभ झाला.
प्रताप पाटील जी प सदस्य, जळगाव यांच्या हस्ते बोअरवेल कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात मुकुंद नन्नवरे माजी सभापती पं. स. धरणगाव, उत्तम पाटील, संजय पाटील, गोकुळ पाटील, देविदास पडसे, नवल पारधी, किसन राठोड, अनिल बल्लुरकर, संस्थेच्या वतीने विजय राऊत, अश्विनी रॉबर्ट, आंकिता मेश्राम आदी मान्यवर आणि ग्रमवासी उपस्थित होते.
या बोअरवेल कार्यक्रमासाठी तालुक्याचे तहसीलदार नितीन कुमार देवरे , प्रथमेश मोहळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.