पहिलेच पावसाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकार आजचा चौथ दिवस असून, विधानसेभेच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते महेश मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यामध्ये हा राडा झाल्याने समोर आले आहे.
सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विरोधकदेखील पायऱ्यांवर घोषणाबाजी चालू होती. अचानक एकनाथ शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या सुरुवातीला शाब्दीक वाद झाले आणि त्यानंतर हे प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मिटकरांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटातील नेत्यांनी सर्वात प्रथम शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. आई-बहिणींनीवरुन शिवीगाळ केल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे. सत्त समोर येण्या आधी समजुतीचा मार्ग काढण्यास समाज देण्यात आला आहे. घडलेल्या सर्व प्रकारामुळे शिंदे सरकार टीकास्त्र सोडले जात आहे. विरोधकांकडून अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.