जळगाव : प्रतिनिधी
शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हाने) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. हा खून इतका भयंकर होता की तरुणाला तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने तो जागीच ठार झाला होता. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,शहरातील एसएमआयटी महाविद्यालायाजवळ मुख्य रस्त्यावर रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भावेश पाटील याच्या भावाने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली आहे की, निवृत्ती नगरातील बंधन बँकेच्या समोर रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भावेश याची हत्या करण्यात आली. जुन्या वादातून हि हत्या झाल्याचे चुलत भाऊ कैलास पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे. हा वाद खेडी येथील वाळूमाफिया भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२) तर दुसरा आव्हाणे येथील मनीष नरेंद्र पाटील (वय २२) या दोघाच्या विरोधात कैलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस स्थानकात भांदवि कलम ३०१ आणि कलम ३४ अन्वये गुन्हा नोद करण्यात आला आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा पोनि अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. जितेंद्र सुरवाडे पुढील तपास करीत आहे.