अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका अंतर्गत रस्ते, ग्रामीण मार्ग व गावांतर्गत असणारे रस्ते अत्यंत खचले आहेत. करता हसनमुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे तर या जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण झाल्याने योग्य निधी उपलब्ध करून देण्याचे मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गैरसोय होत असल्याने सदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.
आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, हसन मुश्रीफ, राजूबाबा आवळे, प्रा. जयंत आसगावकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर महापालिकेसाठी ५० कोटी, इचलकरंजी पालिकेसाठी २५ कोटी आणि जिल्ह्यातील अन्य रस्त्यांसाठी १०० कोटी असा एकूण १७५ कोटीची निधी मिळावा अशी मागणी माजी मंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.तर 25 कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या वैभववाडी, गगनबावडा अशा रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती यावेळी करण्यात आली . कोल्हापूर हा धार्मिक, पर्यटन, औद्योगिक व क्रिडा क्षेत्राच्या दृष्टीने विकसनशील जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांबरोबरच औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात एकूण 12 तालुक्यांचा समावेश असून बहुतांश तालुके हे डोंगराळ भागात मोडतात.