नवं सरकार सत्तेत आल्यानंतर राजकीय समीकरणं पालटले आहे राज्यपाल नियुक्त 12 नावांवरुन महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळाला होता. राज्यपाल नियुक्त या आमदारांची गेल्या दीड वर्षापासून खुपच चर्चा होत आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडून 12 नावं राज्यपालांना पाठवण्यात आले . आमदारांचं एकूण भाजपला 12 पैकी 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. या 12 नावांमध्ये नेमकी कोणाची नावे असणार याकडे लक्ष लागले आहे. या चार जागांसाठी शिंदेगटातील माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ यांची नावं आघाडीवर आहेत.
आधीच्या महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेरपर्यंत मंजूर केली नव्हती. याप्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. सरकार सत्तेवर येताच राजभवनाचा कारभार पुन्हा गतिमान झाला आहे. त्यामुळे दीड वर्षांपासूनचा हा तिढा सुटणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.