• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माझी तुलना गद्दारांशी करू नका : राज ठाकरे !

editor desk by editor desk
August 23, 2022
in Uncategorized
0

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात सत्ता बदल झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून शस्त्रक्रिया झाल्याने घरीच विश्रांती घेत होते. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर राज ठाकरेंनी आज पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी माझी तुलना गद्दारांशी करू नका असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. त्याचसोबत बाळासाहेब ठाकरेंची एक आठवणही सांगितली आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्यांना घेऊन बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडांचा उल्लेख करताना राज ठाकरेंचं नावही वारंवार उल्लेखलं जात होतं. त्यावरुन राज ठाकरेंनी तेव्हाच ठणकावून सांगितलं होतं की माझी तुलना गद्दारांशी करू नका. त्याच संदर्भातली एक आठवण राज ठाकरेंनी शेअर केली आहे.

आजवर ही आठवण आपण कोणासोबतही शेअर केली नव्हती, असंही यावेळी बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरेंची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल राज ठाकरे बोलले आहेत. राज ठाकरे म्हणाले, मी सेना सोडताना बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायला गेलो, शेवटची भेट. त्यावेळी माझ्यासोबत मनोहर जोशी होते. ते खोलीतून बाहेर गेले. मी आणि बाळासाहेब खोलीत होतो. बाळासाहेबांनी माझ्यासमोर हात पसरले, मला मिठी मारली आणि मला म्हणाले, “जा”. त्यांना समजलं की, मी दगाफटका करुन, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडत नाहीये. आणि दुसऱ्या पक्षातही गेलेलो नाही. तुमच्या सर्वांच्या विश्वासावर मी माझा नवा पक्ष स्थापन केला.

दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर राज ठाकरेंची ही पहिली सभा आहे. राज ठाकरेंच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते विश्रांती घेत होते. राज्यातल्या सत्तांतराच्या खेळामध्ये ते सक्रिय झाले आहेत. आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेच्या पुनर्बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. त्यांचे पुत्र अमित ठाकरेही विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत आहेत.

Previous Post

घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच सरपंचाच्या थेट निवडीस ‘मविआ’चा विरोध : आ सुरेश भोळे

Next Post

नव्या सरकारची राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांची नावे आली समोर 

Next Post
नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा मुहूर्त ठरला, आमदार मुंबईकडे रवाना

नव्या सरकारची राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांची नावे आली समोर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !
क्राईम

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !

July 7, 2025
ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !
राजकारण

ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !

July 7, 2025
राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !
कृषी

राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !

July 7, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !
राजकारण

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

July 7, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

July 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

वृद्ध महिलेचा कपड्याने बांधून घरातून लांबविला मुद्देमाल !

July 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group