जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व वाय आर जी केअरच्या मार्फत अमृत महोत्सव कोवॅक्सिन व कोविशिल्ड लसीकरण शिबिर स्व शांताबाई बाबुराव पाटील सभागृह व्यंकटेश कॉलनी जळगाव येथे २३ रोजी सकाळी 10:00 वाजता आयोजित करण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत संपन्न झालेल्या या शिबिरास उदंड असा प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम साजरे होत आहे.
त्या दृष्टीने नारी शक्तीने देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे शिबिर आयोजित केले. देशाचे स्वातंत्र्य अभंग टिकण्यासाठी देश बळकट हवा व त्यासाठी देशाच्या नागरिकाचे आरोग्य हे चांगले असावे या दृष्टीने सुदृढ व सशक्त असावा या दृष्टिकोनातून बुस्टर डोसच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले.100% लसीकरण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वाय.आर. जी. केअर व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव आरोग्य विभाग तसेच जळगाव शहराच्या महापौर मा जयश्रीताई महाजन याच्या सहकार्याने लसीकरण शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन महापौर मा जयश्री महाजन नगरसेवक नितीन बरडे, बंटीभाऊ जोशी , मराठा सेवा संघाचे राम दादा पवार तसेच नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनिषा पाटील वैशाली झाल्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले अनेक नागरिकांनी तसेच महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी संगीता चौधरी, नूतन तासखेडकर,भाग्यश्री महाजन,नेहा जगताप, किमया पाटील, योगिता बाविस्कर, योगिता ठाकूर, सुनिता पांडव या उपस्थित होत्या. शिबिरास ज्योती राणे, रेणुका हिंगू, भारती कापडणीस शशी शर्मा यांचे सहकार्य लाभले.