जळगाव : प्रतिनिधी
जिल्हात दोन महिन्यापासून खुनाचे सत्र सुरूच आहे , २१ रोजी सांयकाळी जळगावात खून तर २२ रोजी यावल तालुक्यात खून झाल्याने प्रंचड खळबळ उडाली होती. यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची चांगलीच कसरत करावी लागत आहे तर दुसरीकडे गणेशोस्तव येत असल्याने पोलिसांच्या डोक्यावरचे भर आणखी वाढणार आहे. यात २२ रोजी झालेल्या गणेश मंडळाची बैठक पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
गणेश मंडळांनी लोकसहभागातून आपल्या निधीतील 10 टक्के निधी आपआपल्या भागात सीसीटीव्ही बसवण्यासाठी खर्च केल्यास 60 टक्के क्राइमला आळा बसेल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बोलतांना सांगितले.
सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्ताने सोमवारी सकाळी 11 वाजता मंगलम हॉल येथे पोलिस प्रशासन, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदस्यांच्या सूचनांवर बोलताना ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी सोशल मीडियातून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांच्या सूचनेनुसार प्रत्येक मंडळाने त्यांच्या निधीतून 10 टक्के रक्कम आपआपल्या भागात सीसीटीव्ही बसवण्यासाठी खर्च केल्यास पोलिसांचा मोठा भार हलका होऊन 60 टक्के क्राइमला आळा बसू शकतो, असे सांगितले. मंडळांनी एक खिडकीतून सर्व एनओसी घेणे गरजेचे असल्याचे उपाधीक्षक कुमार चिंथा यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सार्वजनिक गणेश महामंडळाचे सदस्य व शांतता कमिटीच्या सदस्यांनी विविध सूचना केल्या.
शांतता कमिटी व गणेश मंडळाच्या बैठकीत इच्छादेवी ते डी-मार्टदरम्यानच्या गणेश विसर्जन मार्गाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर बोलताना महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, या मार्गातील अतिक्रमण काढण्यात आले आहे. महापालिका अडीच कोटी निधीतून पूर्ण करणार होती. मात्र, हा मार्ग सार्वजनिक बांधकामाच्या ताब्यात असल्याने यावर खर्च झालेला निधी नगरसेवकांडून वसूल करण्यात येईल म्हणून या रस्त्याच्या कामाला विरोध झाला. मात्र, रस्त्याची डागडुजी महापालिकेकडून करण्यात येईल, असे आश्वासन महापौर महाजन यांनी या वेळी दिले.
उत्सव टिकला तर संस्कृती टिकेल
उत्सव टिकला तर संस्कृती टिकेल व अर्थचक्राला गती मिळते. गेली 27 वर्षे जळगावचा सार्वजनिक गणेशोत्सव राज्यात अनोखा ठरला आहे. वर्दीतला माणूस जेव्हा संस्कृतीचा गप्पा मारतो तेव्हा सर्वसामान्यांची जबाबदारी वाढत असल्याची जाणीव सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी या बैठकीत सांगितजे. तसेच देखाव्यांची तयारी दुसऱ्या दिवशीच करावी, गणेश मंडळांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था, दररोज 8 वाजता ‘श्री’ची आरती, स्वच्छ निर्मल्य संकलन रथ असावा, आदी सूचना त्यांनी केल्या.
‘जय गणराय पुरस्कार’
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ‘जय गणराय पुरस्कार’ देण्याची घोषणा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी केली. हे पुरस्कार पहिल्या तीन मंडळांसाठी देण्यात येणार आहेत. पुरस्कारांचे वितरण गणेश विसर्जनानंतर करण्यात येणार आहे.